Home > Political > VIDEO : बीड : पंकजा मुंडे थेट दांडियाच्या मैदानात

VIDEO : बीड : पंकजा मुंडे थेट दांडियाच्या मैदानात

VIDEO : बीड : पंकजा मुंडे थेट दांडियाच्या मैदानात
X

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येत्या 15 तारखेला त्यांच्या उपस्थित भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंचा हा गरबा चांगलाच चर्चेत आला आहे.

पंकजा मुंडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले, यानंतर बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी परळी गाठली, दसऱ्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले असताना परळीत कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर पंकजा मुंडेंनी दांडियाचा मन मुराद आनंद लुटला आहे. यावेळी चिमुकल्या बरोबर गरबा खेळत पंकजा मुंडेंनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.

गरबा खेळतानाचा पंकजा मुंडे यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, महिलांनी देखील पंकजा मुंडे यांच्यासोबत दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी पंकजा मुंडे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.


Updated : 2021-10-14T10:55:59+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top