Home > Political > 'महिला अत्याचाराचा मळा फुलवण्याचं काम सरकारचेच मंत्री करताहेत अन् मुख्यमंत्र्यांचं...'- चित्रा वाघ

'महिला अत्याचाराचा मळा फुलवण्याचं काम सरकारचेच मंत्री करताहेत अन् मुख्यमंत्र्यांचं...'- चित्रा वाघ

महिला अत्याचाराचा मळा फुलवण्याचं काम सरकारचेच मंत्री करताहेत अन् मुख्यमंत्र्यांचं...- चित्रा वाघ
X

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'संजय राठोड

महेबूब शेख ,निलेश लंके हे सरकारचे जावई अद्याप गजाआड का गेले नाहीत. महिला अत्याचाराचा मळा फुलवण्याचं काम सरकारचेच मंत्री करताहेत अन् मुख्यमंत्र्यांचं 'नाचता येईना….असं सुरूय

ही तर विचारांची दिवाळखोरी.आज बाळासाहेबांसारख्या ताठ कण्याच्या नेत्याची कमतरता जाणवतेय.' असा शब्दांत वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

सोबतच त्यांनी शिवसेनेच्या कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून देखील टीका केली आहे. झोळी घेतलेला 'फकीर' असे दरिद्री विचार आमचे नाहीत या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, 'झोळी घेतलेला 'फकीर' नसल्याचं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री बोलताहेत हे खरंय…१०० कोटींच्या वसूलीवर शिक्कामोर्तब…' अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी जोरदार निशाणा साधला.

सोबतच त्यांनी 'उपऱ्यांचं महत्त्व माननीय मुख्यमंत्र्यांना चांगलंच माहित आहे….शिवसेनेनं उपऱ्यांच्या मदतीनंच हे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलंय.. असं ट्विट करत म्हटले आहे.

Updated : 16 Oct 2021 3:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top