Home > Political > 'आता तर अक्षरशः लाज आणली', पुण्यातील घटनेवर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया

'आता तर अक्षरशः लाज आणली', पुण्यातील घटनेवर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया

आता तर अक्षरशः लाज आणली,  पुण्यातील घटनेवर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
X

पुण्यात एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर ती आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच उघडकीस आले आहे. गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात ही मुलगी आली होती. पण त्यावेळी तीथे कुठलीच गाडी नव्हती. आरोपीने आम्ही राहण्याची सोय करतो म्हणून त्या मुलीला रिक्षातून वानवडी परिसरात नेले व त्या ठिकाणी तिच्यावर आठ जणांनी दोन दिवस बलात्कार केला. हा प्रकार काल उघडकीस आला.

हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर सर्वांमध्येच संतापाची लाट उसळली आहे. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संदर्भातील एक ट्विट केले आहे त्यात त्यांनी पुण्यातल्या वानवडी येथील १४ वर्षीय लेकीवर अंगाचा थरकाप उडेल असा सामूहिक पाशवी अत्याचार झालाय मुलीवर उपचार सुरु असून ती गंभीर आहे. रिक्षाचालक तिला रिक्षातून नेतो काय पुढे ५-६ रिक्षा चालक पाशवी अत्याचार करतात २ रेल्वेचे कर्मचारीही त्यात सहभागी होतात. आरोपींना पुणे पोलिसांनी अटकही केलीय राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये गृहविभाचा काडीचाही वचक राहिला नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर देखील टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात वार-पलटवार चालूच आहेत. मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने आम्ही ही असेचं बाहेर येऊन फिरू शकतोयं हे निर्ढावलेपणं विकृतांना आलंय हे नक्की अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष द्या.. अस म्हंटल आहे.

Updated : 7 Sep 2021 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top