Home > Political > चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध?; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर जहरी टीका

चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध?; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर जहरी टीका

अन्यथा आम्हाला सुद्धा 'अरेला कारे' करायची भाषा चांगल्या पद्धतीने येते हे लक्षात ठेवा, असा इशारा सुद्धा यावेळी चित्रा वाघ यांनी संजय राऊतयांना दिला.

चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध?; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर जहरी टीका
X

मुंबई: बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली होती. यावेळी त्यांनी मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) याचं नाव घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला उत्तर देताना, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच प्रतिक्रिया देताना महिलांचा सन्मान राखला जाईल याची काळजी घेत जा, असा इशारा सुद्धा दिला. शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोकं शिक्षण मंत्री बनतात.

कधीकाळी मॉडेलिंग करणाऱ्या स्मृती इराणी केंद्रात मंत्री आहेत. अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना चित्रा वाघ ( Chitra Wagh ) म्हणाल्या, तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?, ते आधी सांगा. चित्रा वाघ ( Chitra Wagh ) या ट्वीट करत म्हंटल्या की, 'संजयजी राऊत काल स्मृती इराणी यांच्या बद्दल जे बरळलात, मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?, ते सांगा मग, मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन…'



तसेच यापुढे भाषण करताना किंवा माध्यमांना प्रतिक्रिया देताना महिलांचा सन्मान होईल, अशीच विधाने करत चला. अन्यथा आम्हाला सुद्धा अरेला कारे करायची भाषा चांगल्या पद्धतीने येते हे लक्षात ठेवा, असा इशारा सुद्धा यावेळी चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिला.

Updated : 9 July 2021 5:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top