Home > Political > "वाघ आहे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही";चित्रा वाघ संतापल्या

"वाघ आहे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही";चित्रा वाघ संतापल्या

वाघ आहे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही;चित्रा वाघ संतापल्या
X

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केलेल्या आरोपाला आता चित्रा वाघ यांनी उत्तर देत मेहबूब शेख यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर "वाघ आहे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही" अशी खोचक टीका सुद्धा केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, " वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत, कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून, सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू, मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या...वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही", असा टोला वाघ यांनी मेहबूब शेख यांना लगावला आहे.

त्यानंतर मेहबूब शेख यांनी सुद्धा वाघ यांना सोशल मीडियावरून उत्तर दिले आहे. त्यामुळे चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यातील सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे.

Updated : 6 Sep 2021 8:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top