Home > Political > 'जनाब संजय राऊत समीर वानखेडे यांना मुसलमान सिद्ध करण्याची तुम्हाला एवढी घाई का लागली?'- चित्रा वाघ

'जनाब संजय राऊत समीर वानखेडे यांना मुसलमान सिद्ध करण्याची तुम्हाला एवढी घाई का लागली?'- चित्रा वाघ

जनाब संजय राऊत समीर वानखेडे यांना मुसलमान सिद्ध करण्याची तुम्हाला एवढी घाई का लागली?- चित्रा वाघ
X

'जनाब संजय राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे, हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे.' अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

कोकणातील वादळग्रस्तांना मोबादला मिळत नाही, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. आरोग्य विभागात घोटाळा होतोय, MPSC च्या तरूणांचे भविष्य अंधारात ढकललं जातंय. रोज राज्यातील लहान मुली महिलायांवर लैंगिक अत्याचार होताहेत.या सर्व विषयावर आपल्याला भाष्य करायचे नाही. पण, तुम्हाला NCB सारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टारगेट करायचं, त्यांच्यावर वैयक्तिक टीका करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे. असा घणाघात वाघ यांनी केला.

नगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयचा घोषणा दिल्या आणि त्यांना विरोध करण्यांचेचे डोके फोडले जातात आणि तुमची यंत्रणा मात्र, उलट विरोध करणाऱ्यांवरच कारवाई करते. यावर तुम्हाला बोलायचं नाही. कारण जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचा आहे अशी टीका वाघ यांनी केली. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते असंही म्हणाल्या.

Updated : 27 Oct 2021 6:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top