Latest News
Home > Political > रोहित तूझं अभिनंदन! आबांच्या पावलावर पाऊल टाकत यश मिळवलंस - चित्रा वाघ

रोहित तूझं अभिनंदन! आबांच्या पावलावर पाऊल टाकत यश मिळवलंस - चित्रा वाघ

रोहित तूझं अभिनंदन! आबांच्या पावलावर पाऊल टाकत यश मिळवलंस - चित्रा वाघ
X

आज राज्यभरातील नगरपंचायतींच्या निवडणूकांचे निकाल लागले आहेत. या निवडणूकीत कवठेमहांकाळ नगरपंचायतीत १७ पैकी १० जागांवर राष्ट्रवादीच्या रोहित पाटील यांनी विजय मिळवला आहे. या विजयानिमित्त भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रोहितचं फेसबूक पोस्टद्वारे विशेष कौतूक केलं आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नगर पंचायतीच्या निवडणूकांची रणधूमाळी माजली होती. या निवडणूकीत कवठे महांकाळ येथे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी १७ पैकी १० जागांवर विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी कौतूकाचा वर्षाव होत आहे. पुर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या आणि सध्याच्या भाजपच्या आघाडीच्या महिला नेत्या चित्रा वाघदेखीलरोहित पाटील यांचं कौतूक करण्यापासून स्वतःला रोखू शकल्या नाहीत. त्यांनी एका फेसबूक पोस्टद्वारे रोहित पाटलांचं कौतूक केलं आहे.


या पोस्टमध्ये त्यांनी रोहित पाटील यांचं, आबांच्या पावलावर पाऊल टाकत लोकांची नस पकडलीस आणि विजय मिळवलास अशा शब्दांत अभिनंदन केलं आहे. त्या या पोस्टमध्ये म्हणतात, "रोहीत तुझं खूप अभिनंदन…कोणतं पद असो की नसो… आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची. आबांच्या पावलांवर पाऊल टाकत तू हा जनसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला.. त्याचं फळ तुला आज मिळालंय. हे यश तुझं आहे. आज आबा असते तर त्यांना तुझा अभिमान वाटला असता…"

का होतंय इतकं कौतूक?

कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणूकीत रोहित पाटील यांनी १७ पैकी १० जागांवर विजय मिळवला असला तरी तो सहज आणि सोपा नव्हता. या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीमधील सर्व घटकपक्ष हे स्वतंत्रपणे निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. हे कमी म्हणून की काय तर राष्ट्रवादीचाच एक गट विरोधात असतानाही रोहित पाटलांचा हा विजय खूप काही सांगून जाणारा आहे. महत्वाचं म्हणजे रोहित पाटील हे अवघ्या २३ वर्षांचे आहे. आर.आर. पाटील यांच्याप्रमाणेच रोहित पाटील भविष्यात मोठी भुमिका बजावताना दिसतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Updated : 2022-01-19T21:20:30+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top