Home > Political > "सरकारचा खोटारडेपणा लोकांना कळतो, जनता नक्की धडा शिकवेल" भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका

"सरकारचा खोटारडेपणा लोकांना कळतो, जनता नक्की धडा शिकवेल" भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका

सरकारचा खोटारडेपणा लोकांना कळतो, जनता नक्की धडा शिकवेल भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका
X

सरकारने राज्यात वीजबिल थकलेल्या तब्बल ७१ लाख ६८ हजार ५९६ विजग्राहकांना थेट नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत ग्रहाकांना थकित वीजबिल भरण्याचे बजावण्यात आल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या राज्य सरकारच्या या निर्णयांवर टीका केली आहे.

"सरकारचाच फ्यूज उडाला आहे. अनेक लोकांना 50 हजारांपेक्षा जास्त वीजबिलं आली आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलेली आश्वासने पाळण्यात राज्य सरकारला अपयश आलय. त्यांना जनता नक्की धडा शिकवेल." असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. त्या कल्याण मधील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यातर्फे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.


Updated : 1 Feb 2021 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top