Home > Political > भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल?

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल?

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल?
X

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती समोर येत आहे. वाघ यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं वाघ यांनी म्हटले आहे.


काही दिवसांपूर्वी मेहबूब शेख यांच्यावर औरंगाबाद येथील एका तरुणीने अत्याचार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. यावेळी मेहबूब शेख यांना अटक करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली होती.

आता चित्रा वाघ यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समोर येत असून चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले आहे की,"आज मी चिपळूणला आहे व मला बरेच जणांचे फोन येताहेत की, शिरूर कासार येथे मेहबूब शेख च्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केलायं.

महिला अत्याचार करणाऱ्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर, असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा पण मी बोलत रहाणार..लडेंगे..जितेंगे,' असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.


आपली फसवणूक करून आणि नोकरीचे आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी एका तरुणीने मेहबूब शेख यांच्यावर केला होता. त्यानंतर मात्र पुढे पोलिसांनी तपासात मेहबूब शेख यांना क्लीन चिट दिल्याचे सुद्धा बोललं जात होतं. त्यावेळी चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत मेहबूब शेख यांच्या अटकेची मागणी केली होती.

Updated : 3 Aug 2021 12:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top