Home > Political > बायका मुलांवर कारवाई करणाऱ्यांना *** म्हणतात – संजय राऊत

बायका मुलांवर कारवाई करणाऱ्यांना *** म्हणतात – संजय राऊत

वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीसला खासदार संजय राऊत यांचे उत्तर

बायका मुलांवर कारवाई करणाऱ्यांना *** म्हणतात – संजय राऊत
X

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतत संजय राऊत यांनी "घरातल्या महिलांवर मुलांवर हल्ले करण्याला नामरदानगी म्हणतात" असं म्हणत भाजपला इशारा दिला आहे. ईडी हा भाजपचा पोपट आहे, ईडीचा वापर करुन त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर भाजपला हे महागात पडेल. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणता तर मर्दासारखं वागा. घरातल्या महिलांवर मुलांवर हल्ले करण्याला नामरदानगी म्हणतात. असा इशारा संजय राऊत यांनी दिली आहे.

तर नोटीशीवर स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले की, "दहा वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने ५० लाखांचं कर्ज घेतले होते. मात्र,त्यांची नोटीस आज पाठवणं म्हणजे १० वर्षानंतर ईडीला जाग आली आहे. याचा अर्थ जर सरकार कारस्थाने करून पडत नसेल तर ईडीद्वारे पाडण्याचा डाव भाजपवाल्यांनी आखला आहे" असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्याचबरोबर 'मी जर तोंड उघडले तर केंद्रातील नेत्यांना हादरे बसतील,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Updated : 28 Dec 2020 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top