Home > Political > भाजपामध्ये महिलांचा सन्मान नाहीच; मंदा म्हात्रे यांचा पक्षाला घरचा आहेर

भाजपामध्ये महिलांचा सन्मान नाहीच; मंदा म्हात्रे यांचा पक्षाला घरचा आहेर

पक्षाकडून मला आता डावलले जात असून महिलांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचं देखील म्हात्रे यांनी म्हटले आहे.

भाजपामध्ये महिलांचा सन्मान नाहीच; मंदा म्हात्रे यांचा पक्षाला घरचा आहेर
X

भाजप मध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याची खंत मंदा म्हात्रे यांनी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढं व्यक्त केली. यावेळी त्यांनी मी दोन वेळा विधानसभेवर निवडून गोले त्याच पक्षाकडून मला आता डावलले जात असून महिलांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड संघर्ष करावा लागतो. तसेच भाजप मध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याची देखील खंत मंदा म्हात्रे यांनी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढं व्यक्त केली. याच बरोबर त्यांनी, मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती असे म्हटले गेले. पण आता मी दुसऱ्यांदा निवडून आले आहे. आता तर मोदींची लाट नाही ना? निवडून आले हे माझे काम आहे. माझे कर्तृत्व आहे. पण महिलांनी केलेले काम झाकून टाकायचे त्याच्या बातम्या माध्यमात येऊ द्यायचा नाहीत असे प्रकार होत असल्याचे देखील आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे.

महिलांना यश मिळाल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडून महिलाचे पंख छाटले जातात. पण मी कुणालाही घाबरत नाही. आणि मला कोणालाही घाबरायची गरजही नाही मी नेहमीच स्पष्ट बोलते. भविष्यात मला टिकीट मिळो अगर न मिळे मी मात्र लढत राहणार. साथ देण्यासाठी इतरही पक्ष असतात अशा सर्व गोष्टी मंदा म्हात्रे यांनी मंत्री यशोमती ठाकूर याच्यापुढे व्यक्त केल्या.

Updated : 4 Sep 2021 8:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top