Home > Political > देशाला दुसरी महिला राष्ट्रपती मिळणार?

देशाला दुसरी महिला राष्ट्रपती मिळणार?

देशाला दुसरी महिला राष्ट्रपती मिळणार?
X

राष्ट्रपतीपदासाठी भाजपने उमेदावाराच्या नावाच्या घोषणा केली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीनंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदासाठी भाजपाकडून द्रौपदी मोर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुर्मू यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल म्हणून काम केले आहे. मुळच्या ओडिशामधील रहिवासी असलेल्या द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती झाल्या तर सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत.

विरोधकांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपविरोधात उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा यांच्यात लढत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एनडीएतर्फे २० नावांवर चर्चा करण्यात आली. पण अखेर द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. द्रौपदी मोर्मू ह्यांनी शिक्षिका म्हणून कामाची सुरुवात केली होती. पण त्यानंतर त्यांनी राजकारणात भाग घेतला. ओडिशामध्ये त्यांनी आमदार म्हणून काम केले आहे. तसेच त्या काही कालावधीसाठी मंत्री होत्या. २०१५ ते २०२१ या काळात त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून काम केले आहे.

दरम्यान द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशामध्ये सत्तेत असलेल्या बीजेडीच्या प्रमुखांना पण पाठिंबा देण्यासाठी विनंती करणार असल्याचे म्हटले आहे. ओडिशाच्या मातीमधील कन्या राष्ट्रपती होणार आहे त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण विनंती करणार असल्याचे मुर्मू यांनी म्हटले असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. भाजपकडील बहुमताचा आकडा पाहता द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.


Updated : 22 Jun 2022 3:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top