Home > Political > शिवसेना नेत्या म्हणतात "दुख होता है, भाजपा राम को सीता से ही अलग करने में लग गयी है"

शिवसेना नेत्या म्हणतात "दुख होता है, भाजपा राम को सीता से ही अलग करने में लग गयी है"

शिवसेना नेत्या म्हणतात दुख होता है, भाजपा राम को सीता से ही अलग करने में लग गयी है
X

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी उत्तर प्रदेशच्या भाजप प्रदेश कार्यालयात बसवण्यात आलेल्या राम मुर्तीच्या अनावरणाचे फोटो आपल्या ट्वीटर शेअर केले. यामध्ये रामाच्या बाजूला सीता नसल्याने शिवसेनेच्या महिला नेत्या व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर टीका केली आहे.

काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?

नड्डा यांचे ट्वीट रिट्वीट करत प्रियंका यांनी "श्रीराम हा सीतेशिवाय अपूर्ण वाटत नाही का? जर सीताहरण झाले नसते तर रावणाचा वध झाला असता का? या सत्याच्या लढ्यात सीतेचे काहीच योगदान नव्हते का? परंतु, भाजपमधील पुरुषप्रधान मनोवृत्तीची मजल राम आणि सीतेला वेगळे करण्यापर्यंत पोहोचली आहे. रावणानेही हेच केले होते. हे सर्व पाहून दु:ख होत." असं म्हटलं आहे.

सध्या राम मंदीराची चर्चा आहे. अशातच प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या टीकेमुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.


Updated : 23 Jan 2021 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top