Home > Political > बाळासाहेबांना अटक केली असती का भाजपचा सवाल आणि त्यावर शिवसैनिकांची भन्नाट उत्तर

बाळासाहेबांना अटक केली असती का भाजपचा सवाल आणि त्यावर शिवसैनिकांची भन्नाट उत्तर

राणा दांपत्याला अटक झाल्यानंतर भाजपने बाळ ठाकरेंचं एक व्यंगचित्र टाकून बाळासाहेबांना अटक केली असतीत का हा प्रश्न विचारला आणि त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट उत्तरं दिली आहेत.

बाळासाहेबांना अटक केली असती का भाजपचा सवाल आणि त्यावर शिवसैनिकांची भन्नाट उत्तर
X

युती तुटल्यापासून पासून शिवसेना आणि भाजप हे सातत्याने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला याचा प्रत्यय देखील आला आहे नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्य विरोधात शिवसेना ज्या पद्धतीने लढली जो संघर्ष झाला त्यानंतर या दांपत्याला राजद्रोहाच्या सलमान अंतर्गत अटक देखील करण्यात आली मात्र भाजपनं यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे भाजप महाराष्ट्र या आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भाजपनं सत्ताधाऱ्यांना किंबहुना शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना अटक केली असती का असा थेट सवाल विचारला आहे भाजप ने विचारलेल्या प्रश्नावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत.

यावर एम. एच. या वापरकर्त्याने भाजपला थेट रावणाच्या अवलादीची उपणा दिली आहे. ते म्हणतायत, "भाजप रावण ची अवलाद आहे? धर्माला बदनाम करून ठेवले ? भगवान राम यांना बदनाम करून ठेवले आता हनुमान यांना बदनाम करू राहिले ? तुमचं राजकारण करायचं स्वतःच्या नावावर करावा धर्माच्या नावावर कशाला करतात धर्माला कशाला बदनाम करतात ? लोकांना दाखवून कोणती महाआरती होती", आणि त्यांनी धर्माला कशाला बदनाम करताय असा सवालच विचारला.

नितेश गौरव या वापरकर्त्याने तर बाळासाहेब तुमच्यासारखे पेपरावरचे हिंदूत्व नव्हते. असा टोलाच लगावला आहे. "बाळासाहेब बाळासाहेब होते तुमच्या सारखे पेपरावरचे हिंदुत्व न्हवते.. जाळणारी लोक आहात तुम्ही.. सत्ता नाही म्हणून पागल झाले आहे तुमचे सर्व नेते.. त्यांना काही सुचतच नाही. आणी तुमच्या सारख्या आय.टी वाल्यांना शिवसेनेशिवाय काही उरले नाही.."

बाळासाहेब बाळासाहेब होते तुमच्या सारखे पेपरावरचे हिंदुत्व न्हवते.. जाळणारी लोक आहात तुम्ही.. सत्ता नाही म्हणून पागल झाले आहे तुमचे सर्व नेते.. त्यांना काही सुचतच नाही
. आणी तुमच्या सारख्या आय.टी वाल्यांना शिवसेनेशिवाय काही उरले नाही..

— Nitesh Gurav ( Monty )🚩🇮🇳 (@GuravNitesh) April 25, 2022

संजय या वापरकर्त्याने तर शिवसेनेला भुत पिशाच्च म्हटलं आहे, "हनुमान चालीसा में है की,"भूत पिशाच्च निकट नहीं आले,महावीर जब नाम सुनाये". इस लिये हनुमान चालीसा से डर गये शिवसेना नाम के भूत पिशाच्च.एक औरत से लडने ,सब भूत पोलिस की कृपा से गये."

तर वैभव कोंगे या वापरकर्त्याने, "बाळासाहेब असते तर दुसऱ्याच्या घरात घुसून हनुमान चालीसा पठण नसते केले", असं म्हणत भाजप वर टीका केली आहे.

डॉ. नितिन कुमार यांनी, "भाजपच्या महाराष्ट्र राज्य बदनामीचा खरपूस समाचार घेतला असता..", असा टोलाच भाजपला लगावला आहे.

संजू बाबा या वापरकर्त्याने, "शिवसेने ची काळजी शिवसेना करेल, तुम्ही तुमचा बघा,पुढच्या वेळी 105 च्या ऐवजी 80 तरी येतील का हा प्रश्न गहन आहे, आताच परत मी पुन्हा येईन सारखे वागणे सुरू झाले आहे, फसणार परत", अशी भविष्यवाणीच केली आहे.

तर किशोर या वारकर्त्याने," केस कोर्टात आहे. तुम्ही कोर्टाचा अवमान करत आहात. हा एक मोठा गुन्हा आहे. ज्याने कोणी हे ट्विट लिहिले असेल. त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. आणि मग प्रत्येकक्षात कोणी मदतीला येत नाही. घरादाराला हेलपाटे घालावे लागतात कोर्टात. बाकी हक्काचे पुढारी फक्त तोंडाची काळजीच्या गोड वाफा घालतात", असं म्हणत कोर्टाची आठवण करून दिली आहे.

या अशा एक ना अनेक प्रतिक्रीया भाजपच्या ट्वीट वर आल्या आहेत. एकंदरीत काय शिवसेना असो किंवा भाजप किंवा मनसे असो यांना राजकारण करण्यासाठी अजुनही बाळ ठाकरे आठवावेच लागतात. बाळ ठाकरे असते तर त्यांनी काय केलं असतं वगैरे या जर तरच्या प्रश्नांना वर्तमानात काहीही अर्थ नसतो हेच खरं. तरीही अनेक नेटकरी आपला वेळ या प्रश्नांवर खर्च करताना आपल्याला पहायला मिळतायत.

Updated : 26 April 2022 6:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top