Home > Political > 'जनआशीर्वाद यात्रे'तून भारती पवारांची ठाकरे सरकारवर टीका

'जनआशीर्वाद यात्रे'तून भारती पवारांची ठाकरे सरकारवर टीका

महाविकास आघाडी सरकारमधील त्रुटी दाखवण्यासाठी ही यात्रा आयोजित केली असल्याचं पवार यांनी सांगितलं.

जनआशीर्वाद यात्रेतून भारती पवारांची ठाकरे सरकारवर टीका
X

नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळात बदल करण्यात आले असून, ज्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. हे सर्व मंत्री 15 ऑगस्टनंतर आपापल्या भागात परतले असून, सर्वच मंत्र्यांकडून जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सुद्धा पालघरमधून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. मात्र यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तर महाविकास आघाडी सरकारमधील त्रुटी दाखवण्यासाठी ही यात्रा आयोजित केली असल्याचं पवार यांनी सांगितलं.


यावेळी माध्यमांशी बोलताना पवार म्हणाल्यात की, "केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, अशी टीका राज्य सरकारवर पवार यांनी आहे. तसेच आपल्या या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ग्रामीण भागातल्या लसीकरणाची माहिती घेणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं ही आपली जबाबदारी असल्याचं, सुद्धा त्या म्हणाल्यात.

पहिल्या दिवशी भारती पवार यांची जनआशीर्वाद पालघर, मनोर, चारोटी, तालसरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या ठिकाणी पोहचली. यावेळी पवार यांनी स्थानिक लोकांशी सवांद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच यावेळी त्यांनी स्थानिक महिलांसोबत नृत्यूही केलं.

Updated : 17 Aug 2021 11:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top