Home > Political > Punjab मुख्यमंत्री 16 वर्षाने लहान मुलीसोबत करणार लग्न..

Punjab मुख्यमंत्री 16 वर्षाने लहान मुलीसोबत करणार लग्न..

पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान लग्न करणार आहेत.(Bhagwant Mann Marriage) भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांना दोन मुलं असून ते त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत अमेरिकेत राहतात. त्यांनी पहिल्या पत्नीपासून सोडचिठ्ठी घेतली आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव इंद्रजीत आहे. दोघांनी २०१६ मध्ये सोडचिठ्ठी घेतली होती.

Punjab मुख्यमंत्री 16 वर्षाने लहान मुलीसोबत करणार लग्न..
X

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (४८) हे गुरुवारी दुसरे लग्न करणार आहेत. हरियाणातील पेहोवा येथील रहिवासी डॉ. गुरप्रीत कौर (32) यांच्यासोबत सकाळी 11 वाजता चंदीगड येथील सीएम हाऊसमध्ये ते लग्न करणार आहेत. मान आणि गुरप्रीत यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त अरविंद केजरीवाल यांचे कुटुंबीयही लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

कुठं होणार लग्न

चंदिगढ मध्ये खूप कमी लोकांच्या उपस्थितीत भगवान मान लग्न करणार आहेत.भगवंत मान ज्यांच्याशी लग्न करणार आहेत. त्यांचे नाव डॉ. गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या लग्नाला आपल्या परिवारासह हजर राहणार आहेत.

कोण आहेत डॉ. गुरप्रीत कौर?

भगवंत मान यांची होणारी पत्नी त्यांच्या नात्यातील असल्याचं बोललं जातंय. मान यांच्या आईशी तिची ओळख आहे. तसंच भगवंत मान यांच्या आईला देखील त्या पसंद आहेत. गेल्या काही दिवसांपासून भगवंत मान आणि डॉ गुरप्रीत सिंह यांची एकमेकांशी ओळख आहे.

2019 पासून मान कुटुंबाशी ओळख होत आहे..

डॉ. गुरप्रीत कौर ही मूळची टिळक कॉलनी, पेहोवा, हरियाणातील प्रभाग 5 येथील आहे. त्यांनी अंबाला येथील मुलाना मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. ती आता राजपुरा येथे राहते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, भगवंतच्या बहिणीची गुरप्रीतसोबत चांगली मैत्री आहे. याच कारणामुळे मानचे कुटुंबीय गुरप्रीतला चांगलेच ओळखत होते. भगवंत आणि गुरप्रीत 2019 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी मान हे संगरूरचे खासदार होते. मान यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यातही त्या हजर होत्या.

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट

सीएम मान यांची पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरसोबतचे संबंध राजकारणामुळे बिघडले होते. 2014 मध्ये त्यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांची पहिली पत्नी इंद्रप्रीत कौर हिनेही प्रचार केला. मात्र, पुढच्याच वर्षी संबंध बिघडू लागले. सीएम मान म्हणाले की, मी कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. त्यांनी कुटुंब आणि पंजाबमधून पंजाबची निवड केली. त्यानंतर 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.त्यानंतर पत्नी मुलांना घेऊन अमेरिकेला गेल्या आहेत.

Updated : 7 July 2022 4:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top