Home > Political > 'बेटी बचाव बेटी पटाव' नरेंद्र मोदींचा एक शब्द चुकला आणि हा घोटाळा झाला...

'बेटी बचाव बेटी पटाव' नरेंद्र मोदींचा एक शब्द चुकला आणि हा घोटाळा झाला...

बेटी बचाव बेटी पटाव नरेंद्र मोदींचा एक शब्द चुकला आणि हा घोटाळा झाला...
X

नुकत्याच झालेल्या जागतिक आर्थिक परीषदेमधे मोदींच्या तांत्रिक बिघाड समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. आज पुन्हा

मोदी व्हायरल झाले आहेत, ब्रह्मा कुमारींनी आयोजित कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संबोधित करताना त्यांनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ऐवजी 'बेटी बचाव, बेटी पटाव,' म्हटल्यानं त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर लोकांना संबोधित करताना एका घोषणेचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्याने त्यातून चुकीचा संदेश जातो, अशी टीका त्यांच्यावर होत आहे.

या कार्यक्रमात मोदी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या घोषणेचा संदर्भ देत बोलत होते. मात्र, बोलताना ते पढाओ शब्द चुकीचा बोलले त्यामुळे घोषणेचा पूर्ण अर्थ बदलला आणि त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी देखील मोदींचा हा व्हिडीओ ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधलाय. 'टेलीप्रॉम्टरवर वाचूनही हे काय बोलून गेले मोदीजी, थोडी तरी लाज ठेवा,' असं कॅप्शन टाकत त्यांनी पोस्ट टाकली आहे.

एकंदरीच WEF मधील तांत्रिक गोंधळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा ट्रोल होत आहेत. आता भाजप काय प्रतिक्रीया देतयं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 20 Jan 2022 9:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top