Home > Political > 'अजित दादां'च्या वाढदिवसानिमित्ताने सुप्रिया सुळेंनी दिल्या अशा शुभेच्छा

'अजित दादां'च्या वाढदिवसानिमित्ताने सुप्रिया सुळेंनी दिल्या अशा शुभेच्छा

अजित दादांच्या वाढदिवसानिमित्ताने सुप्रिया सुळेंनी दिल्या अशा शुभेच्छा
X

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राजकारणात 'दादा' म्हणून सर्वांच्या परिचयाचे असलेले अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या आजच्या या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच एक फाईल सेल्फी फोटो सुद्धा ट्वीट केला आहे.

सुळे यांनी ट्वीट करत लिहलं आहे की, "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आपल्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र देशात प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी सदैव सज्ज आहे. आपणांस निरोगी असे दिर्घायुष्य लाभावे ही प्रार्थना, अशा शुभेच्छा सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना दिल्या आहेत.

राजकारणातील उत्तम अशी भाऊ-बहिणीची जोडी म्हणून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची ओळख आहे. राजकारणाच्या पलीकडे एक उत्मम कुटुंब म्हणून सुद्धा पवार कुटुंबाकडे पहिले जातात. पवार कुटुंबात शरद पवारांनंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही बहीण-भावाने महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Updated : 22 July 2021 4:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top