Home > Political > राजीनामा सत्र; बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन मुंबईला रवाना 

राजीनामा सत्र; बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन मुंबईला रवाना 

राजीनामा सत्र; बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन मुंबईला रवाना 
X

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात बीड येथील खासदार प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत, मुंडे भगिनी समर्थकांमध्ये राजीनामा सत्र पाहायला मिळत आहे. उद्या ( मंगळवार ) या संदर्भात पंकजा मुंडे आपल्या समर्थकांची बैठक घेणार आहे. या बैठकीला बीड जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची सुद्धा उपस्थिती असणार असून, 74 राजीनामे घेऊन ते मुंबईला रवाना झाले आहेत.

केंद्रात संधी हुकल्याने मुंडे समर्थक सोशल मिडियावरून आपली नाराजगी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे.त्यात सोमवारी पंकजा मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सुद्धा घेतली असल्याची चर्चा आहे.

मात्र मोदींच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने, उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्यात मुंडे समर्थकांचे राजीनामाBeed BJP district president leaves for Pankaja Munde's meeting

सत्र अद्यापही थांबलेले नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होणार? पंकजा मुंडे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 12 July 2021 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top