Home > Political > उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य यांचा राजीनामा...भाजप मोठी जबाबदारी देणार?

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य यांचा राजीनामा...भाजप मोठी जबाबदारी देणार?

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य यांचा राजीनामा...भाजप मोठी जबाबदारी देणार?
X

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी राष्ट्रपतींकडे दिला आल्याची माहिती राज्यपालांचे सचिव बिके संत यांनी दिली आहे. बेबी रानी मौर्य या तीन वर्ष उत्तराखंडच्या राज्यपाल म्हणून काम पाहत होत्या. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी दिल्ली इथे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेने जोर धरला होता. आता या राजीनाम्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशात मोठी जबाबदारी देण्यात येणार आल्याची सुद्धा चर्चा आहे. त्याच बरोबर नवीन राज्यपाल कोण असणार याची देखील सर्वांना उत्सुकता आहे.

मागच्या महिन्यातच राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारून त्यांना तीन वर्ष पूर्ण झाली होती. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद सुद्धा साधला होता. त्यावेळी त्यांनी महिलांना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्यावर भर देणार असुन महिला सशक्तिकरणासाठी सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे म्हटले होते.

कोण आहेत बेबी रानी मौर्य

बेबी रानी मौर्य या 1995 ते 2000 पर्यंत आग्र्याच्या महापौर होत्या.

त्यानंतर 2001 मध्ये त्या सामाजिक कल्याण बोर्डाच्या सदस्य होत्या.

त्यानंतर 2002 साली त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य सुद्धा राहिल्या आहेत.

Updated : 8 Sep 2021 10:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top