Home > Political > 'अर्णब गोस्वामी चोर है' म्हणत आमदार विद्या चव्हाण यांचे आंदोलन

'अर्णब गोस्वामी चोर है' म्हणत आमदार विद्या चव्हाण यांचे आंदोलन

अर्णब गोस्वामी चोर है म्हणत आमदार विद्या चव्हाण यांचे आंदोलन
X

रिपब्लिक टीव्ही चे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि BARC चे माजी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यामध्ये व्हाट्स अप वर झालेले कथीत संभाषण सध्या चर्चेचा विषय आहे.

या चर्चेमध्ये देशाच्या सुरक्षिततेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात असून याबाबत आज राष्ट्रवादी ने आंदोलन केले. गली गली मे शोर है, अर्णब गोस्वामी चोर है... अटक करा अटक करा अर्णब गोस्वामी ला अटक करा... अशा घोषणा देत आज अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर आंदोलन केलं.

या आंदोलनात विद्या चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे उपस्थित होते. अर्णब गोस्वामी ला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याने चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी याचा उपयोग केला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा. अशी मागणी माजी आमदार विद्या चव्हाण यांनी केली.

Updated : 21 Jan 2021 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top