Home > Political > "देवेंद्र फडणवीस मग अन्वय नाईक प्रकरणाचा तपास का दाबला?" नाईक कुटुंबीयांचा सवाल

"देवेंद्र फडणवीस मग अन्वय नाईक प्रकरणाचा तपास का दाबला?" नाईक कुटुंबीयांचा सवाल

देवेंद्र फडणवीस मग अन्वय नाईक प्रकरणाचा तपास का दाबला? नाईक कुटुंबीयांचा सवाल
X

मनसुख हिरेन प्रकरणात ज्या वेगाने तपास होतो आणि कारवाई होते. मग अन्वय नाईक प्रकरणात तपास का दाबला गेला? अस सवाल अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी विचारला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषद त्यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल विचारले आहेत.

"आम्हाला न्याय कधी मिळणार आता हे तिसरं वर्ष आहे. त्यावेळच्या सरकारने 5 मे 2018 ला रात्री 11 वाजता जेव्हा FIR दाखल झाला तेव्हा त्यांनी हा प्रश्न विधान सभेत का उचलला नाही? अंबानी श्रीमंत आहेत त्यांच्या जिवाला थ्रेट आहेत. मग आमच्या जिवाला थ्रेट नाही का? आम्हालाही धमक्या येतायत त्यामुळं आम्हालाही झोप लागत नाही. ही कोणती लोकशाही? आम्हाला न्याय कधी मिळणार?" असे अनेक प्रश्न नाईक कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत.


Updated : 11 March 2021 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top