Home > Political > अदिती तटकरेंच्या शपथविधी नंतर अनिकेत तटकरेंचे ट्विट चर्चेत...

अदिती तटकरेंच्या शपथविधी नंतर अनिकेत तटकरेंचे ट्विट चर्चेत...

अदिती तटकरेंच्या शपथविधी नंतर अनिकेत तटकरेंचे ट्विट चर्चेत...
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काल त्यांच्या पक्षातील काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला हा पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही क्षणातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही मोठ्या नेत्यांनी सुद्धा मंत्रीपदाच्या शपथ घेतल्या. यामध्ये या सरकारमधील पहिल्या महिला मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी सुद्धा शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्यामुळे त्यांच्यावर वारंवार टीका केली जात होती. सरकारला एक वर्ष झालं तरी सरकारमध्ये एकही महिला मंत्री नव्हती. पण काल ज्या काही सगळ्या घडामोडी झाल्या त्यामध्ये राज्याला या सरकार मधील पहिल्या महिला मंत्री मिळाल्या आहेत हेही तितकंच महत्त्वाचे आहे. अदिती तटकरे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली, यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा त्यांनी मंत्री पदाची जबाबदारी पार पाडली होती. आता अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर व राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचे भाऊ अनिकेत तटकरे यांचे एक ट्विट सध्या जोरदार चर्चेत आहे..

काल पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी अदिती तटकरे यांचे वडील सुनील तटकरे हे सुद्धा उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाला त्यांचे भाऊ आमदार अनिकेत तटकरे उपस्थित नसल्यामुळे अनेक ठिकाणी कुजबूज सुरू होती. एकीकडे ही कुजबूज सुरू असताना आता अनिकेत तटकरे यांचे एक ट्विट समोर आले आणि त्या ट्विट नंतर पुन्हा ते चर्चेत आले आहेत त्यांनी ट्विट करत काय म्हटला आहे पाहुयात..

अनिकेत तटकरे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, आज भारताच्या बाहेर असल्यामुळे आदितीच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. पण फोनवरून आम्ही तो पाहिला आणि विद्यमान सरकारमधली पहिली महिला मंत्री बनण्याचा मान तिला मिळालाय, याचा आनंद व अभिमान वाटला. मंत्री म्हणून मागच्या कार्यकाळातही तिने अनेक महत्त्वाची कामे करून लोकांचा विश्वास संपादन केला आहे. भविष्यातही ती निश्चितच तिचे जनसेवेचे कार्य द्विगुणित करेल, याची मला खात्री आहे. मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!

Updated : 3 July 2023 4:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top