Home > Political > अमृता फडणवीसांना लाच देण्याचा पर्यंत, नक्की प्रकरण काय?

अमृता फडणवीसांना लाच देण्याचा पर्यंत, नक्की प्रकरण काय?

अमृता फडणवीसांना लाच देण्याचा पर्यंत, नक्की प्रकरण काय?
X

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे अमोर आले आहे. या संदर्भात मुंबईतील एक डिझायनर आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे अनिष्का असे या डिझायनर महिलेचे नाव आहे. अनिष्काच्या वडिलांविरोधात एक गुन्हा नोंद आहे आणि याच प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी तिने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की प्रकरण काय आहे?

अनिष्का या फॅशन डिझायनर आहेत. मागील 16 महिन्यांपूर्वी त्या अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आल्या. आपण डिझाईन केलेले कपडे अमृता फडणवीस यांनी वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये घालावेत म्हणून ती अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली. 2021 मध्ये अनिष्काने तिच्या आईचं निधन झाल्यानंतर तिने एकटीने संपूर्ण घराची जबाबदारी एकटीने संभाळल्याचे अमृता फडणवीस यांना सांगितलं होतं. या पहिल्या भेटीनंतर अनिष्का ही नंतर अमृता फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जात असे. उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावरही ती येत होती. या काळात तिने अमृता फडणवीस यांना काही कार्यक्रमात ड्रेस आणि ज्वेलरी परिधान करण्यासाठी दिली होती. त्यानंतर अनिष्काने अमृता फडणवीस यांच्याकडे काही बुकिंग विषयी माहिती देखील मागितली होती आणि या बदल्यात त्यांना ती एक कोटी रुपये द्यायला तयार होती. इतकाच नाही तर वडिलांना एका गुन्हेगारी प्रकरणातून सोडवण्यासाठी देखील तिने अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे.

डिझायनर अनिष्का विरोधात पोलिसात तक्रार दाखल..

यासंदर्भात अमृता फडणवीस यांनी मलबारहिल पोलीस ठाण्यात 20 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. फडणवीस यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, अनिष्काने 18 आणि 19 फेब्रुवारीला एका अज्ञात मोबाईल नंबर वरून त्यांना एक व्हिडिओ क्लिप, मेसेज आणि व्हॉइस नोट पाठवली त्यानंतर अनिष्का आणि तिच्या वडिलांकडून अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे धमकावण्यात आले. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर अनिष्का आणि तिच्या वडिलांविरोधात कलम 120 ब, 1988 मधील कलम 8 व कलम 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Updated : 16 March 2023 8:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top