Home > Political > अमृता फडणवीस यांनी भावाचा फोटो केला शेअर

अमृता फडणवीस यांनी भावाचा फोटो केला शेअर

अमृता फडणवीस यांनी भावाचा फोटो केला शेअर
X


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात . त्या स्वतः गायन करतात. त्याचबरोबर विविध सौन्दर्य स्पर्धांमध्ये त्यांना परीक्षक म्हणून बोलवले जाते . नुकतेच, लंडनमध्ये त्यांचा 'इंडिया ऑफ द वर्ल्ड' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.ब्रिटनच्या संसदेत 'इंडो-यूके संबंध' या विषयावर बोलणे आणि ब्रिटनच्या संसदेत 'इंडियन ऑफ द वर्ल्ड' पुरस्कार प्राप्त करणे, हा सन्मान होता.असे ट्विटही त्यांनी केले होते.

सतत त्यांच्या पोस्ट आणि वक्तव्यांमुळे अमृता फडणवीस चर्चेत असतात.तसेच सोशल मीडियावर सुद्धा त्या सक्रिय असल्याचे दिसून येते . रक्षाबंधन निम्मित त्यांनी आपला आणि आपल्या भावाचा फोटो शेअर केला आहे . ज्यामध्ये त्यांनी लिहलं आहे कि ," #रक्षाबंधनाच्या शुभेच्छा स्वतंत्र, बलवान, सामर्थ्यवान, आत्मविश्वासू, खुल्या मनाच्या, कणखर, धाडसी, चिकाटी असलेल्या सर्व बहिणींना,दृढ आणि विश्वासू, संवेदनशील, जबाबदार असलेल्या सर्व बांधवांना,

विचारशील, विचारशील, समर्थन करणारा आणि लहान असूनही माझ्यापेक्षा मोठ्या दिसणाऱ्या माझ्या भावाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा "

Updated : 11 Aug 2022 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top