Home > Political > अनिल देशमुख, परमबीर सिंह हे कुठे हनिमूनला गेलेत माहीत नाही?; अमृता फडणवीस यांची टीका

अनिल देशमुख, परमबीर सिंह हे कुठे हनिमूनला गेलेत माहीत नाही?; अमृता फडणवीस यांची टीका

अनिल देशमुख, परमबीर सिंह हे कुठे हनिमूनला गेलेत माहीत नाही?; अमृता फडणवीस यांची टीका
X

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला टीका केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे कुठे हनिमूनला गेलेत माहीत नाही? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला आहे.त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून सुरु असलेल्या कारवाईचे त्यांनी समर्थन केलं आहे. 'एक पोलीस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी गोष्ट आहे.', अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. या सरकारमधील नेत्यांना मस्ती आली आहे असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

तुम्ही तसे कृत्य करता म्हणून तुमच्यावर आरोप होतात, जर तुम्ही जलयुक्त शिवार सारख्या चांगल्या योजनेवर आरोप करू शकतात तर आम्ही आमच्या नजरेसमोर होत असलेल्या चुकीच्या कृत्यावर आरोप करू शकत नाही का? असा सवाल देखील अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला.

Updated : 21 Oct 2021 4:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top