Home > Political > अमृता फडणवीस व रुपाली चाकणकर एकाच मंचावर, नक्की काय घडलं?

अमृता फडणवीस व रुपाली चाकणकर एकाच मंचावर, नक्की काय घडलं?

अमृता फडणवीस व रुपाली चाकणकर एकाच मंचावर, नक्की काय घडलं?
X

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या एकाच मंचावर दिसल्या व त्यानंतर समाजमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. त्या कार्यक्रमातील या दोघींचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी असा संघर्ष पेटला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे येथे केंदीय मंत्री स्मृती इराणी आल्या होत्या. त्यावेळी कार्यक्रम ठिकाणी झालेल्या गदारोळात एका भाजपच्या कार्यकर्त्याने महिलेवर हात उगारला आणि त्यानंतर हा वाद पेटला आहे. राज्याच्या राजकारणात हे सगळं घडत असताना काल अचानक एक फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागला. तर हा फोटो होता अमृता फडणवीस आणि रुपाली चाकणकर यांचा, त्या दोघी काल एका कार्यक्रमासाठी एकाच मंचावर उपस्थित होत्या.

आता त्या एकाच मंचावर दिसल्यामुळे लोक वेगवेगळे अर्थ लावत आहेत. पण हा कार्यक्रम काही राजकीय नव्हता. एका पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात त्या उपस्थित होत्या. पण फोटोत त्या एकत्र दिसतायत म्हंटल्यावर समाजमाध्यमांवर चर्चेला जोर धरला.

ग्रॅविटस फाउंडेशन गेल्या चार वर्षांपासून URJA अवॉर्ड्सचे आयोजन करत आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या, समाजात बदल घडवणाऱ्यां व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

URJA पुरस्कारांची पाचवा पुरस्कार वितरण सोहळा काल पार पडला. या कार्यक्रमास अमृता फडणवीस, शर्मिला ठाकरे, मेधा कुलकर्णी आणि रुपाली चाकणकर व त्याचसोबत भावना पांडे आणि क्रीडापटू अंजली भागवत यांसारख्या सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. त्यामुळे या मंचावर फक्त अमृता फडणवीस व रुपाली चाकणकरचं उपस्थित नव्हत्या..

Updated : 19 May 2022 6:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top