Home > Political > आई बहिणींवरून आम्हाला शिवीगाळ केली : अमोल मिटकरी

आई बहिणींवरून आम्हाला शिवीगाळ केली : अमोल मिटकरी

आई बहिणींवरून आम्हाला शिवीगाळ केली  : अमोल मिटकरी
X


"50 खोके एकदम ओक्के"अशी घोषणा देत अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षातील नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीने विधानसभा परिसर दणाणून सोडला.यानंतर आज सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी देखील असेच आंदोलन केले आहे.

त्यांनी कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडी वर निशाणा साधला आहे .त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर पसरत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यामधील सदस्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली आहे याबाबत अधिक माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली . त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर आरोप केला आहे .

"आम्हाला धक्काबुक्की करत आई बहिणी वरून शिवीगाळ" केल्याचा आरोप त्यांनी शिंदे गटातील सदस्यांवर केला आहे. त्याचबरोबर "आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपणारे लोक आहोत ,पवार साहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आम्ही कधीही विसरणार नाही.पण जर विरोधी पक्ष म्हणून सरकारला जाब विचारला आणि हे आमचं काम आहे त्यामुळे त्यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय ?आणि 50 खोके एकदम ओक्के बोलले की यांच्या जिव्हारी लागत. तेही आम्हाला बेईमान वगैरे म्हणतात अशा प्रकारे टीका करण्याचा अधिकार त्यांना आणि आम्हाला आहे पण आंदोलन करताना मारहाण आणि आई बहिणींवरून शिवीगाळ करत असतील तर ही बाब महाराष्ट्राला अशोभनीय आहे"असं तीव्र मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले आहे.

Updated : 24 Aug 2022 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top