Home > Political > ठाकरे पोहोचले थेट राणेंच्या घरी..

ठाकरे पोहोचले थेट राणेंच्या घरी..

ठाकरे पोहोचले थेट राणेंच्या घरी..
X

राज्यात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामध्ये मनसेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. परवाच एकनाथ शिंदे यांच्या विश्वास दर्शक ठरावासाठी झालेल्या मतदानादरम्यान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला. इतकच नाही तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागच्या काही दिवसांपासून घेतलेल्या भूमिकांमुळे मनसे देखील शिंदे-फडणवीस सरकार सोबत सहभागी होणार का? अशा चर्चा सुरू आहे.

या चर्चा सुरू असताना काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी कणकवली येथे नितेश राणे यांची भेट घेतली. त्यांना भेटण्यासाठी ते त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी गेले होते. त्यामुळे सध्या अमीत ठाकरे आणि नितेश राणे यांच्या भेटीची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.









Updated : 7 July 2022 6:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top