Home > Political > अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावरून अजित पवारांचा टोला..

अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावरून अजित पवारांचा टोला..

अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावरून अजित पवारांचा टोला..
X

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस मागच्या दीड वर्षात अनेक वेळा रात्री भेटायचे याविषयी तुम्हाला माहित होतं का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीवर विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस रात्री हुडी, गॉगल मलाही ओळखणार नाही असे वेशांतर करून बाहेर पडायचे. असं त्या म्हणाल्या होत्या. ते कसे भेटायचे हे अमृता फडणवीसांनी सांगितल्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोमणा लगावला आहे. गेली वर्षभर यासाठी काही लोक काम करत होते. त्यांनी कितीही नाकारले तरी एका नेत्याच्या पत्नीने याविषयी सांगितले आहे की, माझा नवरा अनेकदा वेशभूषा बदलून इतरांना भेटायला जायचे. एकीकडे सांगता या घटनेशी आमचा काही संबंध नाही आणि त्यांच्याच पत्नी हे सांगतात असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोमणा लगावला आहे.

अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, देवेंद्र फडणवीस कुठल्याही पदावर असले तरीही ते फक्त जनतेची सेवा करत राहतात. महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय परिस्थिती पाहता ते पुन्हा येतील असं मला वाटत होतं. देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्री बनणार नाहीत व कुठलंही पद स्वीकारणार नाहीत हे मला थोडं आधीपासूनच माहीत होतं. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्व कसे आहे हे आता सर्वांनाच समजलं आहे. ते मलाही कधी पण सोडू शकतात व राजकारण सोडून समाजकारण सुद्धा करू शकतात. आणि याची जाणीव आज लोकांना सुद्धा झाली आहे. त्यामुळेच त्यांना लोकांनी इतकं प्रेम दिला आहे. असं अमृता फडणवीस यांनी काल एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस मागच्या दीड वर्षात अनेक वेळा रात्री भेटायचे याविषयी तुम्हाला माहित होतं का? असा प्रश्न विचारल्या नंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस रात्री हुडी, गॉगल मलाही ओळखणार नाही असे वेशांतर करून बाहेर पडायचे. असं देखिल त्या म्हणाल्या होत्या. यावरूनच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता हा टोमणा लगावला आहे.

Updated : 2022-07-10T11:18:55+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top