Home > Political > अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल सुप्रिया सुळेंच मोठं वक्तव्य

अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल सुप्रिया सुळेंच मोठं वक्तव्य

अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल सुप्रिया सुळेंच मोठं वक्तव्य
X


अभिनेता सुबोध भावे लवकरच एका नवीन कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे .झी मराठीवर 'बस बाई बस' नावाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.झी मराठीवरील या कार्यक्रमाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार चालू आहे .याच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करणार आहे.बस बाई बस या कार्यक्रमाच्या नावाप्रमाणे हा कार्यक्रम महिलांवर आधारित आहे .वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत .यामध्ये राजकीय, सामाजिक,मनोरंजन या क्षेत्रातील महिला सहभागी होतीलच पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या एपिसोड ची झलक प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अभिनेता सुबोध भावे त्याच्यासंबंधीत कामाचे अनेक व्हिडिओ तसेच पोस्ट शेअर करत असतो.असाच एक व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम ला शेअर केला आहे . बस बाई बस या कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे .या व्हिडिओत अनेक जण सुप्रिया सुळे यांना विविध प्रश्न विचारताना दिसत आहेत .दौऱ्यावर गेल्यावर तुम्ही शॉपिंग करता का ?निवडून येण्यासाठी उपास वगैरे काही करता का ?असे अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी बद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी वेगळ्या अंदाजात उत्तर दिले आहे.

महाराष्ट्रात सकाळचा शपथविधी झाला, तेव्हा अजित दादा आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली. जेव्हा अजित दादा आणि देवेंद्रजी घराबाहेर पडले, तेव्हा तुमच्या घरात वातावरण कसं होतं?', असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळेंना विचारण्यात आले. त्यावर 'तेव्हा मी झोपले होते', असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Updated : 29 July 2022 8:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top