Home > Political > 'नाराजीबाबत कानात जरी सांगितलं असतं., तर मुख्यमंत्री केलं असतं..' अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला

'नाराजीबाबत कानात जरी सांगितलं असतं., तर मुख्यमंत्री केलं असतं..' अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला

नाराजीबाबत कानात जरी सांगितलं असतं., तर मुख्यमंत्री केलं असतं.. अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला
X

भिंती रंगवण्यापासून पोस्टर लावण्यापर्यंत भाजपच्या उभारणीत योगदान देणाऱ्या मूळ लोकांना सोडून, बाहेरुन आलेल्या लोकांना पदं मिळतायत याचं आश्चर्य वाटते आहे, या शब्दात अजित पवार यांनी विधिमंडळातील भाषणात भाजप आणि एकनाथ शिंदे यांना जोरदार टोमणे आणि टोले लगावले. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना अजित पवार यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना चांगलेच फटके लगावले.

भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले लोकच जास्त दिसतात, मूळ भाजपच्या लोकांना पदं मिळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही त्यानंतर अनेकांना रडून आल्याचे सांगत अजित पवारांनी फडणवीस यांनाही टोला लगावला. त्याचबरोबर गिरीश महाजन यांना तर अजूनही रडू आवरले जात नाहीये, असा चिमटाही त्यांनी काढला. एवढेच नाही तर चंद्रकांत पाटील यांनाही तुम्ही बाकडं वाजवू नका, तुम्हाला मंत्रिपद मिळेल की नाही, सांगता येत नाही, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांनी जर माझ्या कानात जरी नाराजीबाबत सांगितले असते तर उद्धव ठाकरे यांना सांगून तुम्हाला मुख्यमंत्री केले असते, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

Updated : 3 July 2022 8:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top