Home > Political > हे सरकार फार काळ चालणार नाही, हे आपल्या ओझ्याने पडेल : यशोमती ठाकूर

हे सरकार फार काळ चालणार नाही, हे आपल्या ओझ्याने पडेल : यशोमती ठाकूर

हे सरकार फार काळ चालणार नाही, हे आपल्या ओझ्याने पडेल : यशोमती ठाकूर
X


महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.२०१९ ची निवडणूक झाल्यापासून अनेक राजकीय भूकंप आपण राजकारणात पाहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. शिवसेना पक्षांनंतर आता राष्ट्रवादीसुद्धा फुटल्याचं आपल्याला दिसत आहे.

अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटस चा आहे भाग असल्याचा राष्ट्रवादीच्या दिग्ग्ज नेत्यांनी सांगितले आहे . गेलेलं आमदार परत येतील अशी अपेक्षा केली जात आहे. अजित पवार आपला एक गट घेऊन महायुतीला मिळाले आहेत. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे.

यावर मात्र काँग्रेसच्या आमदार ऍड. यशोमती ठाकूर यांनी एक ट्विट केलं आहे.

"राज्यातील जनतेच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही कधीही जनमताशी प्रतारणा करणार नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू! हे सरकार फार काळ चालणार नाही, हे आपल्या ओझ्याने पडेल.

जय हिंद,

जय महाराष्ट्र !!!"

यामध्ये ३० ते ३५ आमदार अजित पवारांसोबत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ९ राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपद सुद्धा मिळाले आहे. यामध्ये खासदार सुनील तटकरे यांची या शपथविधीला उपस्थिती दिसत आहे. त्याचबरोबर अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळाले आहे. आता महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे . यामध्ये छगन भुजबळ याना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याला आता १ मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री असणार आहेत.

Updated : 2 July 2023 9:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top