Home > Political > अजित पवार आणि पंकजा मुंडेंमध्ये रंगले शाब्दिक युद्ध...

अजित पवार आणि पंकजा मुंडेंमध्ये रंगले शाब्दिक युद्ध...

काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्यावरती टीका केली त्या टीकेला आता पंकजा मुंडे यांनी उत्तर दिला आहे.

अजित पवार आणि पंकजा मुंडेंमध्ये रंगले शाब्दिक युद्ध...
X

काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर कारखाना चालवण्यासाठी चांगले नेतृत्व लागते, ते येड्यागबाळ्याचे काम नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांना टोला लगावला. यालाचं पंकजा मुंडे यांनी अर्थमंत्री सगळं बजेट स्वतःच्याच कार्यकर्त्यांना, आमदारांना आणि पक्षांना देत आहेत. कारखानदारीवर त्यांचेच वर्चस्व आहे, साखर संघावर देखील त्यांचंच वर्चस्व आहे. आम्ही तर दुष्काळी आहोत आम्ही कारखान्यांमध्ये अत्यंत मागास आहोत. ऊस उभा राहावा यासाठी त्यांनी अनुदान जाहीर करून जायला हवं होत असं म्हणत पलटवार केला आहे.

अजित पवार काय म्हणाले होते..

"साखर कारखाना चालवण्यासाठी चांगले नेतृत्व लागते, ते येड्यागबाळ्याचे काम नाही" या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. बीड जिल्ह्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या डिसलरी उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. इतर पक्षातील नेते फक्त भाषण आणि टीका करतात प्रत्यक्ष काम करत नाहीत असे म्हणत मुंडे भगिनींना टोला लगावला. वैद्यनाथ साखर कारखाना हा गोपीनाथ मुंडे असताना फार चांगल्या पद्धतीने सुरू होता, मात्र आता या कारखान्याची परिस्थिती बिकट आहे, कारण कारखाना चालवण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज लागते आणि आज नेतृत्व कमी पडत असल्याची टीका अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग होत असताना खासदारांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी केली नाही त्यामुळे बीड जिल्ह्यात चौपदरी रस्ते होऊ शकले नाही हे खासदाराचे अपयश आहे असे म्हणत अजित पवार यांनी थेट खासदार प्रीतम मुंडे यांच्यावरही निशाणा साधला.

अजित पवार यांच्या टीकेला पंकजा मुंडे यांचे प्रतिउत्तर..

अजित पवार यांनी केलेल्या या टीकेला आता पंकजा मुंडे यांनी देखील उत्तर दिले आहे. " अर्थमंत्री सगळं बजेट स्वतःच्याच कार्यकर्त्यांना, आमदारांना आणि पक्षांना देत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये त्यांचे आगमन झाले. मला वाटल ते या अशा परिस्थितीत आले आहेत तर ते काहीतरी जाहीर करतील. कारखानदारीवर त्यांचेच वर्चस्व आहे, साखर संघावर देखील त्यांचंच वर्चस्व आहे. आम्ही तर दुष्काळी आहोत आम्ही कारखान्यांमध्ये अत्यंत मागास आहोत. ऊस उभा राहावा यासाठी त्यांनी अनुदान जाहीर करून जायला हवं होत. असं म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाण साधला.

त्याचसोबत राष्ट्रीय महामार्ग होत असताना खासदारांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी केली नाही त्यामुळे बीड जिल्ह्यात चौपदरी रस्ते होऊ शकले नाही या खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपाला सुद्धा पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं त्या म्हणाल्या, आम्ही अकरा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करून एक वरमाळा बीड जिल्ह्याच्या गळ्यामध्ये घातली आहे. एवढेच नाही ज्या भागात तुम्ही पंचवीस वर्षे तीस वर्षे नेतृत्व केलं तिथे देखील राष्ट्रीय महामार्ग आमचे सरकार असताना आले आहेत. इतकं आम्ही काम केलं आल्याच म्हणत त्यांनी पवार यांना प्रतिउत्तर दिलं आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या आहेत..

राज्याचे नेते ज्यांचे सर्वेसर्वा आत्ताच्या सरकारमध्ये जे दिसत आहेत त्यांच्याकडे भरपूर मोठं बजेट आहे. सगळं बजेट ते स्वतःच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना आणि पक्षांना देत आहेत. त्यांचे बीड जिल्ह्यामध्ये आगमन झाले. मला वाटल या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची धुरा त्यांच्याकडे आहे. ते आले आहेत तर काहीतरी जाहीर करतील. कारखानदारीवर त्यांचेच वर्चस्व आहे, साखर संघावर देखील त्यांचेच वर्चस्व आहे. आम्ही तर दुष्काळी आहोत. आम्ही कारखान्यांमध्ये अत्यंत मागास आहोत. मला अशी अपेक्षा आहे जर या राज्याचे अर्थमंत्री आज परभणी आणि बीड जिल्ह्याचा दौरा करत आहेत तर त्यांनी ऊस उभा राहण्यासाठी अनुदान जाहीर करून जायला हवं होत. ऊस उभा राहिला तरी शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही अशा प्रकारची मदत शासनाने उद्योगाला आणि शेतीपूरक व्यवसायाला केली पाहिजे.

लातूर मधला रस्ता बदलापूर मध्येच थांबला तो बीड पर्यंत पूर्णपणे का गेला नाही? अशी टीका त्यांनी काल केली. त्यांना सांगायचा आहे. अभ्यासपूर्ण बोलले पाहिजे. आम्ही अकरा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करून एक वरमाळा बीड जिल्ह्याच्या गळ्यामध्ये घातली आहे. एवढेच नाही ज्या भागात तुम्ही पंचवीस-तीस वर्षे नेतृत्व केलं तिथे देखील राष्ट्रीय महामार्ग आमचे सरकार असताना आले आहेत. इतकं आम्ही काम केलं आल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या...

Updated : 9 April 2022 6:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top