काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभे खासदार अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. अहमद पटेल हे पक्षाचा आधारस्तंभ होते. त्यांचं राजकारणातील नेतृत्व मोठे होतं.
पटेल यांच्या आठवणी सांगताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी एक किस्सा सांगीतला. त्या म्हणाल्या की, "अहमद पटेल यांची भेट मिळणं अवघड होतं. पण युवक काँग्रेसचं काम करत असताना एक गोष्ट आम्हाला कळली की, दर शुक्रवारी नमाज पडल्यावर अहमद भाई कधीच कोणाची भेट नाकारत नसत. मग त्याच संधीचा फायदा घेत युवक काँग्रेस मागण्या घेऊन आम्ही शुक्रवारी त्यांच्याकडे गेलेलो. त्यांचा नमाज झाल्यावर लगेच अहमद भाईंना भेटून मागणी केली आणि त्यांनी मान्य केली." अशी आठवण यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
Updated : 2020-11-25T19:32:40+05:30
Next Story