Home > Political > "मी RSS स्वयंसेवक, आपलं कुणीच काहीही करू शकत नाही" म्हणत RSS स्वयंसेवकाने केला महिलेवर बलात्कार

"मी RSS स्वयंसेवक, आपलं कुणीच काहीही करू शकत नाही" म्हणत RSS स्वयंसेवकाने केला महिलेवर बलात्कार

मी RSS स्वयंसेवक, आपलं कुणीच काहीही करू शकत नाही म्हणत RSS स्वयंसेवकाने केला महिलेवर बलात्कार
X

"राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या एका स्वयंसेवकाने घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत माझ्यावर बलात्कार केला." अशी तक्रार उत्तर प्रदेश पोलीसांत एका महिलेने केली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या फिरोझाबाद पोलीस करत आहेत.

या महिलेने नोंदवलेल्या फिर्यादीत एक स्थानिक आरएसएस स्वयंसेवक अधूनमधून महिलेच्या घरी यायचा. एक दिवस त्याने फिर्यादी महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोक्याला बंदूक लावत आरोपीनं बलात्कार केला. अत्याचार करत असताना महिलेनं आरडाओरड केल्यानं तिच्या बहिणीचा पती आवाज ऐकून धावत आली. यावेळी आरोपीनं आपण आरएसएस स्वयंसेवक असून, आपलं कुणीच काहीही करू शकत नाही, असं म्हणत निघून गेला, असं महिलेनं फिर्यादीत म्हटलं आहे.

याप्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रमुख रामचंद्र कुमार शुक्ला यांनी सांगितलं की, महिलेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. जर तक्रारीत तथ्य आढळून आल्यास आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ती व्यक्ती जर दोषी असेल, तर मग ती आरएसएस स्वयंसेवक असो अन्य कुणी कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही, अस शुक्ला यांनी म्हटलं आहे.

या बाबतचे वृत्त 'इंडीयन एक्सप्रेस' ने दिलं आहे.

Updated : 28 Dec 2020 3:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top