Home > Political > ''एक 'था' कपटी.." अमृता फडणवीस यांनी डिलीट केलं ट्विट..

''एक 'था' कपटी.." अमृता फडणवीस यांनी डिलीट केलं ट्विट..

एक था कपटी.. अमृता फडणवीस यांनी डिलीट केलं ट्विट..
X

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे सरकारचा प्रवास बरखास्तीच्या दिशेने चालल्याची चर्चा असताना अमृता फडणवीस यांनी एक यावीत केलं आणि काही वेळात ते त्यांनी डिलीट केले. "एक था कपटी राज" असं ट्विट त्यांनी केलं होतं. हे ट्विट त्यांनी केलं आणि त्यानंतर काही वेळातच त्यांनी ते डिलीट केलं त्यामुळे मोठी चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंड केले आहे. हे सर्व आमदार आधीप गुजरातमधील सुरत आणि आता आसाममध्ये गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे गटनेते बहुमत असल्याने आपणच गटनेते आहोत, असा दावा केला आहे. त्याच सोबत आता नाराज एकनाथ शिंदे गट हा भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे.

Updated : 22 Jun 2022 7:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top