Home > Political > आदिती तटकरे Vs भरत गोगावले

आदिती तटकरे Vs भरत गोगावले

आदिती तटकरे Vs भरत गोगावले
X

अजित पवारांनी आपल्या पक्षातील काही सहकाऱ्यांसोबत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी आठ सहकाऱ्यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये आदिती तटकरे यांचा सुद्धा सहभाग होता. आदिती तटकरे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे Vs गोगावले असा वाद होण्याची शक्यता आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास जिल्ह्यातल्या शिवसेना आणि भाजपच्या सर्व आमदारांचा विरोध आहे व रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेसाठी राखीव असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलाय. त्यामुळे रायगड मध्ये पुन्हा तटकरे विरुद्ध गोगावले असा सामना रंगू शकतो...Updated : 7 July 2023 10:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top