Home > Political > "सरकार बनवायची घाई असेल तर शिवाजी पार्कात या" यशोमती ठाकूर यांचा ईडीला इशारा

"सरकार बनवायची घाई असेल तर शिवाजी पार्कात या" यशोमती ठाकूर यांचा ईडीला इशारा

सरकार बनवायची घाई असेल तर शिवाजी पार्कात या यशोमती ठाकूर यांचा ईडीला इशारा
X

बुधवारी पहाटे अंमलबजावणी संचालनालय ED ने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यावर आता राज्यभरातील अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनीदेखील ईडीच्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत ईडीवर ताशेरे ओढले आहेत. "ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जण एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७०चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. महा विकास आघाडीची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय.", अशा शब्दात त्यांनी ईडीवर टीका केली आहे.

नवाब मलिक यांच्यावर ईडी च्या या कारवाईनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अनेक नेते यावर आपापल्या शब्दात ट्विटर वर व्यक्त होत आहेत.

Updated : 23 Feb 2022 7:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top