Home > Political > farmers protest : नवदीप कौर यांना जामीन, हरयाणा पोलीसांवर केले गंभीर आरोप

farmers protest : नवदीप कौर यांना जामीन, हरयाणा पोलीसांवर केले गंभीर आरोप

farmers protest : नवदीप कौर यांना जामीन, हरयाणा पोलीसांवर केले गंभीर आरोप
X

गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांनी तीन वेगवेगळ्या प्रकरणात जेलमध्ये डांबून ठेवलेल्या कामगार आणि मागासवर्गीय नेत्या नवदीप कौर यांना जामीन मंजूर कऱण्यात आला आहे. पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अवनीश झिंगन यांच्या खंडपीठासमोर कौर यांचा जामीनअर्ज आणि कोर्टानं दाखल केलेल्या सु मोटो संदर्भात एकत्रित सुनावणी झाली.

नवदीप कौर यांच्याविरोधात तीन FIR दाखल करण्यात आल्या होत्या. नवदीप कौर यांना पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने तुरुंगात डांबल्याच्या आरोपावर सुनावणी सुरू राहणार आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळवण्यात आपल्याला यश आले होते, त्यामुळेच आपल्यावर खोटे आरोप करत अटक करण्यात आली, असा आरोप नवदीप कौर आपल्या जामीनअर्जात केला होता. पोलीस कोठडीत आपल्याला अमानुष मारहाण करण्यात आली तसेच आपल्याला अटक केली तेव्हा कोणतीही महिला पोलीस अधिकारी उपस्थित नव्हती, असाही आरोप त्यांनी केला आहे. नवदीप कौर यांना बेकायदेशीर पद्धतीने डांबून ठेवण्यात आल्याच्या आरोपानंतर पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली होती.

कामगारांची एकत्रित शक्ती उभी राहू नये यासाठी आपल्याला अटक कऱण्यात आली होती, असाही आरोप त्यांनी याचिकेत केला होता. २३ वर्षांच्या नवदीप कौर या मजदूर अधिकार संघटनेच्या सदस्य आहेत. १२ जानेवारी रोजी सिंघू सीमेवर कामगारांच्या वेतनाच्या मागणीसाठी त्यांनी आंदलन केले होते. त्यानंतर सोनीपत पोलिसांनी त्याच दिवशी खुनाचा प्रयत्न करणे, दंगल माजवण, हल्ला करणे आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणे असे आरोप करत नवदीप यांनी अटक केली होती. या भागातील कुंडली औद्योगिक वसाहतीमध्ये नवदीप यांनी उद्योजकांकडून खंडणी मागितल्याची माहिती मिळाल्याने कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Updated : 26 Feb 2021 7:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top