मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न...
Max Woman | 16 Aug 2022 8:58 AM IST
X
X
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगावमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला. पण या कार्यक्रमाला एका घटनेमुळे गालबोट लागले आहे. गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच एका महिलेन स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पण पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच या महिलेला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
Updated : 16 Aug 2022 8:58 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire