Home > Political > काका-पुतण्याच्या वादात प्रतिभा पवारांचे डोळे पाणावले...

काका-पुतण्याच्या वादात प्रतिभा पवारांचे डोळे पाणावले...

काका-पुतण्याच्या वादात प्रतिभा पवारांचे डोळे पाणावले...
X


काका पुतण्या यांच्या संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. काल मुंबईत झालेल्या दोन्ही गटाच्या मेळाव्याला महाराष्ट्रभरातून अनेक लोक मुंबईत आले होते. शरद पवारांपेक्षा अजित पवारांकडे आमदारांची संख्या अधिक होती. आमदार गेले तरी जनता आमच्या सोबत आहे .पक्ष पुन्हा उभ करू नवीन नेतृत्वाला संधी देऊ असं सुद्धा शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. दोन्ही बैठकांमध्ये प्रमुख नेत्यांनी भाषणे केली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. हे सगळं होत असताना समाजमाध्यमांवर चर्चा मात्र वेगळ्याच गोष्टीची होती. चर्चा होती शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या डोळ्यातील आसवांची..

प्रतिभा पवार यांचा एक फोटो समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्यांचे पाण्याने भरलेले डोळे बरच काही सांगून जात आहेत. त्या शरद पवार यांच्यासोबत गाडीत बसल्या आहेत आणि गाडीच्या खिडकीतून त्यांचा हा फोटो काढण्यात आला आहे. शरद पवार यांचे समर्थक आमदार असलेले आणि अजित पवारांच्या बंडखोरीनंतर विरोधीपक्ष नेते म्हणून चर्चेत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर, "या आसवांना आनंदाश्रुत बदलायचं आहे" असं वाक्य लिहिलेलं आहे. या फोटोला आव्हाड यांनी 'इतकच' अशी एका शब्दाची कॅप्शन दिली आहे...

Updated : 6 July 2023 12:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top