Home > Political > महिला शिवसैनिकाने नितेश राणेंना 'कोंबड्या' म्हणत दिले प्रतिउत्तर..

महिला शिवसैनिकाने नितेश राणेंना 'कोंबड्या' म्हणत दिले प्रतिउत्तर..

आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे या ट्विटला एक महिला शिवसैनिकाने कोंबड्या असं प्रतिउत्तर दिलं आहे. त्यांनी दिलेल्या या उत्तराची सध्या समाजमाध्यमांवर चर्चा आहे.

महिला शिवसैनिकाने नितेश राणेंना कोंबड्या म्हणत दिले प्रतिउत्तर..
X

आमदार नितेश राणे यांनी आज एक ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी महागाई वर भोंगे लावण्या अगोदर बीएमसी भ्रष्टाचार सांगणारे भोंगे मुंबईमध्ये चालू केले तर चालतील का? असं म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा सभेत व त्यानंतर झालेल्या ठाण्यातील उत्तर सभेत मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या भूमिकेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं अनेक जणांनी स्वागत केला आहे तर अनेकांनी यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर भोंगा हा शब्द फेसबुक आणि ट्विटरवर चांगलाच ट्रेंडमध्ये आहे.

अनेक राजकीय नेते वेगवेगळे विषय मांडताना भोंगा या शब्दाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतायत. नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये सुद्धा त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार सांगणारे भोंगे मुंबईमध्ये चालू केले तर चालेल का असा एक प्रश्न विचारला आहे?

नितेश राणे यांनी काय ट्विट केले आहे ते प्रथम पाहूया

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महागाई वर भोंगे लावण्या अगोदर.. BMC भ्रष्टाचार सांगणारे भोंगे मुंबई मध्ये चालू केले तर चालतील का? पेंग्विन भ्रष्टाचार पासून सुरू करू...

आता नितेश राणे यांच्या ट्विट वर अनेक कॉमेंट्स येत आहेत. आता या ट्विटला अनेकांनी उत्तर दिलं आहे. तर अनेकांनी याच समर्थन केले आहे. त्यांच्या या ट्विटवर काय कॉमेंट्स आल्या आहेत ते देखील आपण पाहूयात.

अवधूत या ट्विटर वापरकर्त्याने निलेश राणे यांना उत्तर देत म्हटले आहे की, "फडणवीस साहेबांनी तुमच्या वडिलांची भ्रष्टाचाराची कुंडली वाचली होते त्यावर पण बोला"

पूजा अशोक भोसले यांचं ट्विटर हँडल पाहिलं तर त्या आपल्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्याला दिसत आहेत. त्यांनीदेखील नितेश राणे यांना उत्तर दिला आहे. त्या उत्तर देताना त्यांनी म्हटले आहे 'कोंबड्या'

विकास पवार यांनी नितेश राणे यांचं ट्विट रिट्विट करत म्हटले आहे की, यशवंत जाधव च्या भोंग्याने आधीच यांची झोप उडवलीय, कोरोनाच्या 2 वर्षात 36 इमारती मुंबईत विकत घेतल्या. नोकराने इतके तर मालकाने किती कमावले. पेंग्विन पासून खड्डे, रस्ते, नाले, कचरा, उद्याने लिस्ट मोठी आहे मुंबई लुटणाऱ्या भ्रष्ट सेनेची...

यास्मिन जस्टीस YASMIN Justice4SSR या ट्विटर वापरकर्त्या महिलेने नितेश राणे यांना उत्तर देताना म्हटले आहे की, "सर तुम्ही खुनाचे पुरावे सीबीआयला कधी देणार आहात? दिशा सालीयनला न्याय द्या.."

स्मित्री रॉय या महिला ट्विटर वापरकर्त्यांनी म्हटला आहे की, "पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर शांत का? SSR दिशा प्रकरणात तुमच्याकडे पुरावे असल्यास सीबीआयला द्या. SSRains भावनांशी खेळू नका."

तर प्रसाद या ट्विटर वापरकर्त्याने नितेश राणे यांच्या जुन्या ट्विटचा आणि आत्ताच्या एका ट्विटचा असे दोन फोटो एकत्र करून शेअर केले आहेत. यामध्ये नितेश राणे यांनी बाबासाहेब पुरंदरे विषयी पहिला केलेले वक्तव्य आणि त्यानंतर आत्ता केलेले वक्तव्य अशी दोन्ही वक्तव्य आहेत. आता हे दोन्ही ट्विट आम्ही पडताळून पाहिलेले नाहीत. या ट्विटर वापरकर्त्याने त्यांच्या या ट्विट्सचा फोटो त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर केला आहे.

Updated : 2022-04-15T20:54:01+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top