Home > Political > मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर घडला भयंकर प्रकार..

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर घडला भयंकर प्रकार..

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर घडला भयंकर प्रकार..
X

एकीकडे मागील चार दिवसापासू याबाबत न मुसळधार पाऊस पडत असताना कल्याण पूर्वेतील महिलाना मात्र घोटभर पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. आज भर पावसात देशमुख होम्स मधील महिलांनी पाण्यासाठी आंदोलन छेडले. बुस्टर काढण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आक्रमक महिलाच अवतार पाहून अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलाच्या शिष्टमंडळाला एमआयडीसी अधिकाऱ्याबरोबर बैठकीसाठी नेले. मात्र जोपर्यत पाण्याचा प्रेशर वाढवून पाणी प्रश्न सोडविला जात नाही तोपर्यत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा या महिलांनी दिला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील ग्रामीण भागातील देशमुख होम्स या जवळपास १५० सदनिकाची सोसायटी असलेल्या देशमुख होम्स परिसरात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून मागील ६ महिन्यापासून आवाज उठवला होता. मात्र तरीही पाणी प्रश्न जैसे थे आहे. दरम्यान या परिसराला पूर्वी किमान पिण्यासाठी तरी दररोज पाणी मिळत होते मात्र आता नव्याने सुरु असलेल्या आणि उभारण्यात आलेल्या इतर इमारतीनां बुस्टर लावून आपल्या हक्काचे पाणी वळविण्यात आल्याने आपल्या तोंडचे पाणी पळविण्यात आल्याचा आरोप करत सोसायटी मधील रहिवासी असलेल्या वंदना सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १५० महिलांनी आंदोलन छेडले. वरून धो धो पाऊस कोसळत असताना आणि आजूबाजूच्या चाळी मधील घरे पाण्याखाली गेलेली असताना या सोसायटी मधील महिला मात्र पिण्यासाठी पाणी द्या या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. सोसायटीजवळील चौकात ज्या ठिकाणी बुस्टर बसविण्यात आला होता हा बुस्टर काढून टाकण्याचा प्रयत्न महिलाकडून केला जाण्याची शक्यता लक्षात येताच मानपाडा पोलिसांनी मध्यस्थी करत या आंदोलनकर्त्या महिलांच्या शिष्टमंडळाला एमआयडीसी कार्यालयात अधिकाऱ्याबरोबर चर्चेसाठी नेण्यात आले. मात्र अनेक दिवसापासून पाण्यासाठी हाल काढणाऱ्या महिलाचा पाणी प्रश्न सोडविल्या खेरीज हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा या आंदोलनकर्त्या महिलांनी घेतला आहे. तर या बाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांनी महिलांबरोबर चर्चा करत उदया पालिका , एमआयडीसी व पोलीस अधिकारीची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे आश्वासन या महिलांना दिले मात्र अधिकृतपणे कॅमेरा बोलण्यास नकार दिला..



Updated : 5 July 2022 9:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top