Home > Political > शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंच्या बॅनरची चर्चा..

शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंच्या बॅनरची चर्चा..

खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून ठाण्यातील तलावपाळी परिसरातील जांभळीनाका येथील चिंतामणी चौकात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर..

शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंच्या बॅनरची चर्चा..
X

ठाण्यातील तलावपाळी परिसरातील जांभळीनाका येथील चिंतामणी चौकात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाण्यात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लागलेला हा ठाण्यातील पहिला आणि एकमेव बॅनर आहे. येत्या २७ तारखेला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवस आधीच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात हा बोर्ड लावण्यात आला आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर हिंदुत्वाचा तेजोमय वारसा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष असं लिहीत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, ठाण्याचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे, आदित्य ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे शहरात या बॅनरवरून चांगलीच चर्चा रंगली आहे.
Updated : 25 July 2022 2:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top