Home > Political > शिवसेनेचे हे १० खासदार बंड करणार?

शिवसेनेचे हे १० खासदार बंड करणार?

शिवसेनेचे हे १० खासदार बंड करणार?
X

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार गेले. शिंदे यांच्यासोबत या आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता शिंदे गटात शिवसेनेचे काही खासदार देखील जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. आज एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत. दिल्लीत त्यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या संपर्कात कोण खासदार आहेत? याविषयी बोलताना त्यांनी कोणीही खासदार संपर्कात नाही मात्र एक खासदार नक्की संपर्कात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत आणि श्रीकांत शिंदे हे एकमेव खासदार आमच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले..पण असं असलं तरी शिंदे गटाच्या सोबत सध्या शिवसनेच्या एकूण १९ खासदारांपैकी १० खासदार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोण खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे..

श्रीकांत शिंदे

श्रीरंग आप्पा बारणे

भावना गवळी

राहुल शेवाळे

प्रतापराव जाधव

परंतु शिवसेनेचे कोणीही खासदार आपल्या संपर्कात नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

Updated : 2022-07-09T20:49:28+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top