Home > पर्सनॅलिटी > दिल्लीतील कोविड लसिकरण केंद्र सांभाळणाऱ्या तृतीयपंथी डॉक्टर अक्सा शेख

दिल्लीतील कोविड लसिकरण केंद्र सांभाळणाऱ्या तृतीयपंथी डॉक्टर अक्सा शेख

या देशात भेदभाव ही नवीन गोष्ट नाही. इथं भेदभावाचे अनेक प्रकार आहेत. कधी तुमच्या धर्मावरुन, कधी जातीवरुन, कधी तुमच्या रंगावरुन तर कधी लिंगावरुन इथं भेदभाव केला जातो. असचं काहीसं घडलंय कोविड लसीकरण केंद्राच्या नोडल अधिकारी असलेल्या पहिल्या तृतीयपंथी महिला डॉक्टर अक्सा शेख यांच्या सोबत...

दिल्लीतील कोविड लसिकरण केंद्र सांभाळणाऱ्या तृतीयपंथी डॉक्टर अक्सा शेख
X

तिचा जन्म एका मुलाच्या शरीरात झाला. जेव्हा त्याला आपण 'वेगळं' असल्याची जाणीव झाली तेव्हा तो निराश झाला. समाजाने ठरवलेल्या 'आदर्श चौकटीत' स्वत: ला ठेवण्यासाठी बरेच वर्षे संघर्ष केला. पण यश मिळाले नाही. मग त्याला कळलं इथं आपला आनंद महत्वाचा आहे. त्यासाठी स्वतःच्या जीवनाचे निर्णय स्वत:च घेणं महत्वाचे आहे. मग असा निर्णय घेतला, जो खूप कठीण होता. माणसाचा देह सोडून ती स्त्री बनली. नाव आक्सा शेख.

डॉक्टर अक्सा 38 वर्षांच्या असून दिल्लीच्या हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चच्या कोविड लसीकरण केंद्राच्या नोडल अधिकारी आहेत. एवढच नाही तर आक्साला आपण तृतीयपंथी असल्याचा गर्व आहे. आक्सा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती जेव्हा लसीकरण केंद्राची प्रमुख झाली तेव्हा खऱ्या अर्थाने आक्सा प्रकाषझोतात आली.

डॉक्टर आक्सा यांचा जन्म मुंबईत झाला. घरी आईवडील आणि दोन मोठे भाऊ. कुटुंबातील सदस्यांनी मुलाप्रमाणे अक्साला वाढवलं. झाकीर असे नाव दिले. आई-वडिलांसाठी तीन मुलगे होते. पण ज्यावेळी आक्साला समज आली तेव्हा तिला कळलं की आपण वेगळे आहोत. तेव्हा आक्सा कुणाशी काही बोलायची नाही की कुणाला काही सांगची नाही. तिला मुलांपेक्षा मुलींसोबत खेळायला आवडायचं. लोक चिडवायचे. कधीकधी लहान मुलं देखील तिला 'हिजरा' आणि 'छक्का' बोलायचे.

डॉ. अक्स्याच्या मेडिकल कॉलेजचं ते तिसरं वर्ष होतं. तेव्हा अक्साचं ब्लडप्रेशर वाढू लागलं. कॉलेजमधल्या डॉक्टरांना दाखलं. अक्साने एंडोक्रिनोलॉजिस्टला भेट दिली. इथं पहिल्यांदाच एका डॉक्टरने अक्साला तिच्या लैगीक जिवनाबद्दल विचारलं होतं.

त्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितलं अक्सा तिची लिंगबदल शस्त्रक्रीया करु इच्छीते. हे ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसला. यावर उपाय म्हणून तिचं लग्न लावण्याचा विचार सुरु झाला. शेवटी अक्साने मुंबई सोडली आणि दिल्ली गाठली. सुरुवातीला एका NGO सोबत काम केलं. त्यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाली.

अक्सा सांगते आईने सुरुवातीला शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली नव्हती. पण नंतर ती तयार झाली. शस्त्रक्रियेनंतर देखील तिने स्वीकारण्यासही वेळ दिला. पण आता ती दिल्लीत आपल्या आईबरोबर राहते.

Updated : 17 Jun 2021 10:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top