Home > पर्सनॅलिटी > "विनाकारण गाड्या अडवण्याचा पोलीसांना अधिकार नाही" – IPS तेजस्वी सातपुते

"विनाकारण गाड्या अडवण्याचा पोलीसांना अधिकार नाही" – IPS तेजस्वी सातपुते

विनाकारण गाड्या अडवण्याचा पोलीसांना अधिकार नाही – IPS तेजस्वी सातपुते
X

सोलापूर जिल्ह्यामध्ये विवाह, वारकरी दिंडी, दशविधी, धार्मिक कार्यक्रम यांसाठी जाणार्यास वाहनांना विनाकारण अडवून त्रास देणार्याल वाहतूक शाखेच्या पोलिसांवर कडक कारवाई केली जाइल असे आदेश सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, "काही लोकांकडून आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या विनाकारण गाड्या अडवून कागदपत्र मागितली जातात. काहीनाकाही चूका काढून मोठे दंड आकारले जातात. आणि दंडाची रक्कम भरण्याइतके पैसे त्या व्यक्तीकडे नसतील तर भ्रष्टाचाराच्या घटना घडतात. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला."

"या नियमांचे एक विस्तृत परिपत्रक काढून ट्राफीक विभागाने काय करावं आणि काय करु नये याचं मार्गदर्शनही आम्ही दिलं आहे."असं सातपुते यांनी सांगीतलं.

Updated : 6 March 2021 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top