Latest News
Home > पर्सनॅलिटी > या हिजाब घातलेल्या 'गली गर्ल'चे झाले हजारो चाहते..

या हिजाब घातलेल्या 'गली गर्ल'चे झाले हजारो चाहते..

सानिया मिस्त्री या 'गली गर्ल'चे सध्या एक रॅप सॉंग व्हायरल होतं आहेत. ती गरीब-श्रीमंत भेदभाव, वाईट परिस्थिती, समाजाच्या वेदना, संघर्ष तिच्या रॅप मधून मांडत असते. या कमी वयात तिने मिळवलेले यश आणि त्यापाठीमागचा संघर्ष सर्वांनाच अचंबित करणारा आहे.

या हिजाब घातलेल्या गली गर्लचे झाले हजारो चाहते..
X

सध्या सोशल मीडियावर एक हिजाब परिधान करून रॅप गाणारी तरुणी रॅपर 'गली बॉय' चित्रपटातील मुराद अहमदची आठवण करून देत आहे. चित्रपटात मुराद अहमदची भूमिका रणवीर सिंगने केली आहे. सानिया मिस्त्री असे या 'गली गर्ल'चे नाव आहे. सानियाचे वय अवघे 15 वर्ष आहे. या कामी वयात पण तिचा संघर्ष काही कमी नाही.

कलर्सवर प्रसारित होणार्‍या हुनरबाज या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये ती स्टेजला तिने सर्वांनाच हादरून सोडलं होतं, जिथे तिच्या गाण्यांनी बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीसुध्दा प्रभावित केले होते. वाचा, कोण आहे सानिया मिस्त्री? ती कुठे राहते आणि तिचे कुटुंब काय करते?

सानिया मिस्त्री मुंबईतील एका झोपडपट्टीत राहते. तिचे वडील रिक्षाचालक असून आई घरी काम करते. 15 वर्षांची सानिया 11वीत शिकते. सानिया वयाच्या 11 व्या वर्षापासून रॅप करत आहे. सानियाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलखीचीच आहे. सुरवातीला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी तिच्याकडे स्वत:चा मोबाईलही नव्हता, त्यामुळे ती तिच्या मैत्रिणींची मदत घेऊन तिने तिची हे रॅप रेकॉर्ड केले. आणि आज ती तिच्या या रॅप सॉंगचे लाखो चाहते आहेत.

अफाट परिश्रम आणि मनात यशस्वी होण्याची जिद्द

सानिया मिस्त्री यावर्षी कलर्सवर प्रसारित होणाऱ्या हुनरबाज शोमध्ये दिसली होती. इथे तिने आपल्या रॅपने परीक्षकांना तर प्रभावित केलेच, पण प्रेक्षकांची मनेही जिंकली. सानियाच्या रॅपमध्ये गरीब-श्रीमंत असा भेदभाव, वाईट परिस्थिती, वेदना, संघर्ष आणि पर्वतासारखे धैर्य दाखवण्यात आले आहे. शोचे जज मिथुन चक्रवर्ती त्यांच्या गाण्याचे बोल पाहून प्रभावित झाले. सानियाचे कौतुक करताना त्याने या गाण्याचे बोल थेट हृदयाला भिडणारे असल्याचं म्हटले. मिथुन दाकडून तिची स्तुती ऐकल्यानंतर सानियाही हुनरबाजच्या मंचावर खूप भावूक झाली होती. या नंतर तिला एक वेगळीच ओळख मिळाली.

बालपणी भेदभाव, गरिबीचे सोसावे लागले चटके

घरची आणि आजूबाजूच्या लोकांची गरिबी पाहून तिने लहानपणापासूनच कविता लिहायला सुरुवात केली होती. तिला लहानपणापासूनच गरिबीमुळे भेदभावाला सामोरे जावे लागले आहे. अनेक ठिकाणी प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओ मध्ये सानिया सांगते की, मी लहानपणापासून पैशांची कमतरता पाहिली आहे. नंतर तिच्या मैत्रिणींनी तिला रॅपिंगबद्दल सांगितले, तेव्हापासून ती रॅप गाणी म्हणू लागली. तिचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पोस्ट करण्यातही ते तिला मदत करत होते . सानिया म्हणते की, माझ्या आईने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. सुरुवातीला माझ्या आजूबाजूच्या लोकांनी रॅप व्हिडिओ बनवण्याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला असल्याचं ती सांगते.

सोशल मीडियावर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत

सानिया मिस्त्रीचे 'सानिया एमक्यू' नावाचे यूट्यूब चॅनल आहे, ज्यावर तिला 10 हजार लोक फॉलो करतात. इन्स्टाग्रामवरही त्याचे चांगले फॉलोअर्स आहेत.

Updated : 11 April 2022 4:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top