Home > पर्सनॅलिटी > कौशल्य असणाऱ्या प्रत्येकाची 'मैत्रेयी'...

कौशल्य असणाऱ्या प्रत्येकाची 'मैत्रेयी'...

कौशल्य असणाऱ्या प्रत्येकाची मैत्रेयी...
X

श्रीमंत आणि मोठ्या घरात जन्मलेल्या अनेक मुलांची स्वप्न ही फार मोठी असतात. त्यांना लहानपणापासूनच हव्या त्या सर्व गोष्टी सहज मिळतात. उच्च दर्जाचे शिक्षण, उच्च दर्जाची जीवनशैली आणि म्हणेल तिथे फिरण्याची मूभा असते. मात्र नागपूरच्या कटोल तालुक्यातील मैत्रेयी जिचकर याला अपवाद आहेत. मैत्रेयी यांना वरील सर्वकाही गोष्टी सहज उपलब्ध होत्या, त्यांना समाजकार्यात पडायची गरजही नव्हती. मात्र लोकांच्या समस्या, त्यांचा गरजा आणि विषेशतः गरीब लहान मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मैत्रेयी यांनी समाजकार्याचा वसा हाती घेतला.

मैत्रेयी यांनी समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी त्यांचा भाऊ याज्नवलक्य याच्यासोबत मिळून डॉ.श्रीकांत जिचकर फाउंडेशनच्या माध्यमातून 'माय झीरो ग्रेव्हीटी' या संस्थेची स्थापना केली. मैत्रेयी यांनी ग्रामीण भागातील लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, तसेच त्यांची जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यांची उपस्थीती वाढावी, यासाठी अनेक शाळांचा कायापालट केला आहे. शाळांना आकर्षक रंगरोटी करण्यापासून ते मुलांसाठी गरजेच्या वस्तू पुरवणं तसेच त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणं या सर्वांच्या माध्यमातून मैत्रेयी यांनी अनेक लहान मुलांना नव्या जीवनशैलीची भेट दिली आहे.

लहान मुलांना उज्वल भविष्य प्रदान करण्याबरोबरच अनेक नव्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम देखील मैत्रेयी करतात. ज्यांच्यात कौशल्य आहे, पण व्यासपीठ नाही. पैशांचा अभाव आहे. त्याच बरोबर ज्यांच्यात समाजाचा बदल घडवायची दृढ इच्छा शक्ती आहे. अशा लोकांना मैत्रेयी सहाय्य करतात.

माय झीरो ग्रेव्हीटीच्या माध्यमातून मैत्रेयी यांनी अनेकांच्या अंधारं आयुष्य प्रकाशमान केले आहे. मैत्रैयी तरूण आणि तितक्याच प्रतिभावान आहे. त्या ज्या तळमळीने लोकांसाठी काम करतात, त्यांच्या दृष्टीकोनातून अनेकांच्या आयुष्यात शक्य तितका बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात ते खरंच वाखाणण्यासारखं आहे.


मैत्रेयीचे वडील डॉ.श्रीकांत जिचकर हे भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त शिक्षीत व्यक्ती असून त्यांनी तब्बल २० पदव्या मिळवल्या आहेत. भारतातील सर्वात उच्चशिक्षित व्यक्ती म्हणून डॉ.श्रीकांत यांची 'लीम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद आहे. वडीलांच्या इतक्या मोठ्या कर्तृत्वाचं ओझं असताना देखील मैत्रेयी या त्यांचा समाजकार्याचा ध्यास समर्थपणे पूर्ण करत आहेत.

आजकाल पैसा आणि मोठं नाव असेल की देश सोडून जायचा अनेकांचा विचार असतो. अनेक जण 'काय ठेवलं आहे इथे' असं म्हणत परदेशात जाऊन कायम स्वरूपी वसतात. मात्र इथल्या मूलभूत गरजा सुधारण्यासाठी काही मोजकेच लोकं प्रयत्न करतात. त्यांच्यातील एक सध्याच्या तरूणवर्गासमोर आपल्या कामाचा आदर्श निर्माण करणाऱ्या म्हणजे मैत्रेयी...

Updated : 26 March 2021 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top